बुलढाणा ब्रेकिंग…बुलढाण्यातील धाडमध्ये भीषण अपघात; तीन दुचाकीस्वार जागीच ठार! 

बुलढाणा   :  छत्रपती संभाजीनगरहून मलकापूरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तिघा दुचाकीस्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही  घटना बुलढाणा जिल्ह्यातील  धाड येथे आज ५ जानेवारीला सायंकाळी४.५० वाजताच्या सुमारास घडली.  

मलकापूर आगाराची एमएच-०६ बीडब्ल्यू-३६३८ क्रमांकाची एसटी बस करडी (धाड) येथील पुलावर आली असता, धाडकडून करडीच्या दिशेने जाणारी दुचाकी बसला समोरून धडकली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला व ती बसखाली अडकली.

या अपघातात ढालसावंगी (ता. बुलढाणा) येथील अंकुश पाडळे, रवी चंदनशे आणि कैलास शिंदे या तिघांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे ढालसावंगी गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धाड पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »