छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेवरील पाच आमदारांचा विजय झाल्याने या रिक्त जाग्यांसाठी राज्यात पोटनिवडणूक होत आहे. भारतीय जनता पाटने आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील संजय केणेकर यांच्या नावाचा समावेश आहे.

सतीश रेंगे । छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेवरील पाच आमदारांचा विजय झाल्याने या रिक्त जाग्यांसाठी राज्यात पोटनिवडणूक होत आहे. भारतीय जनता पाटने आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील संजय केणेकर यांच्या नावाचा समावेश असून ते सध्या भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत. 1988 पासून भाजपात कार्यरत असलेल्या केणेकर यांना तब्बल 35 वर्षानंतर विधानपरिषदेच्या माध्यमातून पक्ष न्याय देत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दै. महाभूमि शी बोतांना दिली.
राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या एकूण पाच पैकी भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या तीन जागांचा समावेश आहे. तर शिवसेना – राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा येत आहे. प्रवीण दटके (भाजपा), रमेश कराड (भाजपा), गोपीचंद पडाळकर (भाजपा), राजेश विटेकर (राष्ट्रवादी – अजित पवार), आमश्या पाडवी (शिवसेना – एकनाथ शिंदे) या विधान परिषदेच्या पाच आमदारांचा विधानसभेत विजय झाल्याने त्यांच्या जागा रिक्त आहेत. सोमवार, 17 मार्च रोजी या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी पोटनिवडणूक होत आहे. तत्पूव, भाजपाने त्यांच्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये संदीप जोशी, दादाराव केचे यांच्यासह छत्रपती संभाजीनगर येथील संजय केणेकर यांच्या नावाचा समावेश आहे.
केणेकर आक्रमक आंदोलक
संजय केणेकर भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते, आक्रमक आंदोलक म्हणून ओळखले जातात. 1988 पासून ते भाजपात कार्यरत आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपलिकेचे सदस्य, गटनेता, उपमहापौर ते म्हाडाचे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. याशिवाय भाजपा शहराध्यक्ष ते आता प्रदेश सरचिटणीस असा पक्षांतर्गत पदांचा चढता आलेख त्यांच्या नावे आहे. 2009 पासून ते शहरातील पूर्व विधानसभा मतदासंघातून लढण्यास इच्छुक होते. 2014 मध्ये तर उमेदवारीसाठी पक्षांतर्गत धुमशान झाले. विद्यमान मंत्री अतुल सावे आणि केणकर यांच्यातील तो वाद सर्वश्रुत आहे. अखेर 2025 मध्ये त्यांना विधानपरिषदेच्या माध्यमातून आमदार होण्याची संधी प्राप्त झाली आहे. या उमेदवारीमुळे 35 वर्षानंतर पक्षाने आपल्याला न्याय दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.