पैठण : नगर पालिका निवडणुकीत पुन्हा भुमरेच वर्चस्व पैठणमध्ये दिसून आले. नगरपालिकेसाठी 25 जागेसाठी निवडणूक पार पडली होती. रविवार, 21 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी करण्यात आली.

पैठण : नगर पालिका निवडणुकीत पुन्हा भुमरेच वर्चस्व पैठणमध्ये दिसून आले. नगरपालिकेसाठी 25 जागेसाठी निवडणूक पार पडली होती. रविवार, 21 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत 25 सदस्या पैकी 17 सदस्य शिवसेना (शिंदे गट) निवडून आले. तर काँग्रेसचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे दोन, शिवसेना (उबाठा), आणि भाजपचा एक नगरसेवक निवडून आला. या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या विद्या भूषण कवसाणकर ह्या विजयी झाल्या.
पैठण नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे कविता शेखर शिंदे, विलास केरू अडसूळ, वीर जितसिंग करकोटक, राजश्री राजू गायकवाड, ईश्वर भाऊसाहेब दगडे, रासने सुनील भाऊसाहेब, संगीता ज्ञानेश्वर मापारी, वैशाली ईश्वर परदेशीं, महेश रामनारायण मुंदडा, गोवर्धन हरभान टाक, मंगल सुनील हिंगे, रुपाली संजय सोनारे, तुषार सूर्यभान पाटील, वीर अनिता रमेश, रफिक मुस्ताक कादरी, पूजा शिवराज पारीख, योगिता गणेश वरकड, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अलका गोपालसिंग परदेशी, बजरंग भाउसिंग लिंभोरे, काँग्रेसचे मनिषा स्वप्निल साळवे, हसनोद्दीन खुदबोद्दीन काट्यारे, गौरव भिकाजी आठवले, आसिफा बेगम कासमखा पठाण, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या स्नेहल सूर्यकांत धुपे, भाजपचे ज्ञानेश्वर शरदराव दहिवाळ हे उमेदवार विजयी झाले.
दरम्यान, पैठण नगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार उभे केले होते. त्यांना निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला असून त्यांचा केवळ एक सदस्य निवडून आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारत चार जागांवर विजय खेचून आणला.
