संविधानाची मूल्ये जोपासणारी ‘भाऊबिज’! : धारे बंधुनी  बहिणीला दिली संविधान प्रास्ताविकेची प्रतिमा भेट 

बुलढाणा:  जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि नवचैतन्य देणारा सण म्हणजे दिवाळी. याच प्रकाश उत्सवाचा तिसरा दिवस भावा बहिणीच्या नात्यातील गोडवा जपणारा, अर्थात  भाऊबिज. पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या सणाला एक आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले ते देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरु ह्या गावात. येथील संतोष व अरुण धारे या दोन भावांनी भाऊबीजेच्या निमित्ताने आपल्या बहिणीला भारतीय संविधानाची प्रतिमा भेट देऊन समानतेचा संदेश दिला. बंधुता आणि समानता अंगिकृत करणे ही संविधानाचीच मूल्ये असून, खऱ्या अर्थाने  संविधानाची मूल्ये जोपासणारी ही ‘भाऊबिज’ ठरली! 

    भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेम आणि आपुलकी  जपणारी भाऊबिज सर्वत्र उत्साहात साजरी झाली. ज्यामध्ये बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ तिला भेटवस्तू देतो. मात्र, धारे बंधूंनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने भाऊबिज साजरा करून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे.  संतोष आणि अरुण धारे या दोन बंधूंनी आपली बहिणी  सुनिता भालेकर यांना संविधानाची प्रतिमा भेट दिली. या उपक्रमाविषयी, धारे बंधू सांगतात, २०२५ हे वर्ष संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. दुसरीकडे समाजामध्ये  स्वातंत्र्य,समता, बंधुता,  लोप पावत चालल्याचे अनेकदा दिसून येते. यामुळे, सांविधानिक मुल्यांचा प्रचार व प्रसार  करण्याचा निश्चय आम्ही केला.  यामुळे, भाऊबिज निमीत्ताने बहीण सुनिता भालेकर यांना संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिमा भेट देऊन  समाजास योग्य दिशा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यंदा   संविधानाच्याअमृत महोत्सवी वर्षात  अभिनव उपक्रम राबविण्यात आले. गणेशोत्सवाच्या सजावटीमध्ये सुध्दा संविधानाच्या प्रास्ताविकेच्या प्रतिमांचा उपयोग केल्याचे त्यांनी सांगितले. भाऊबिजेला बहिणीला यापूर्वी भेटवस्तू दिल्या आहेत. परंतु, यावर्षी संविधानाच्या प्रास्ताविकतेची प्रतिमा देताना आनंद होत आहे, अशा भावना धारे बंधुनी व्यक्त केली आहे. 

पाच वर्षात 100 पेक्षा अधिकांना दिली भेट

संतोष धारे शासकीय कर्मचारी आहेत. ते हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असून मागील ५ वर्षांपासून संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिमा इतरांना भेट देतात. आतापर्यंत त्यांनी १०० पेक्षा जास्त संविधानाच्या प्रास्ताविकेच्या प्रतिमा  इतरांना भेट दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »