अंबड : सिद्धेश्वर-पिंपळगाव तलाव ओव्हरफ्लो झाल्याने मुसा-भद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे, त्यामुळे तालुक्यातील रूई गावाचा संपर्क तुटला. परिणामी श्रीराम तांडा येथील एका बालकाला उपचारासाठी रूग्णालयात नेता आले नाही. परिणामी उपचाराआभावी या बालकाचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

प्रथमेश प्रेमदास पवार (03), असे उपचाराआभावी मृत्यू झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. मागील आठवड्यापासून या भागात जोरदार पाऊस होत आहे. सिद्धेश्वर-पिंपळगाव तलाव ओव्हरफ्लो झाल्याने भद्रायणी नदीला मोठा पूर आला, त्यामुळे तालुक्यातील रुई ते श्रीराम तांडा या दोन किलोमीटर अंतरात पाणीच पाणी झाले आहे. तांड्यावर राहणाऱ्या प्रेमदास कबीरदास पवार यांचा तीन वर्षाचा मुलगा प्रथमेश हा अचानक आजारी पडला. परंतु रूई गावाचा संपर्क तुटल्याने त्याला उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात नेता आले नाही. उपचाराआभावी त्याची प्रकृती खालावत गेली, परंतु कुटूंबाला काहीच करता आले नाही. परिणामी मंगळवार, 23 सप्टेंबर रोजी त्याचा तांड्यावरच मृत्यू झाला. या तांड्यावर रस्ता व पुलाची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी येथील रहिवाशांनी वारंवार लोकप्रतिनिधींकडे मागणी केली होती. मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही. प्रथमेश याला उपचारासाठी गावातील दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र नदीला आलेल्या महापुरामुळे गावाशी संपर्क तुटल्याने वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही. या रहिवाशांच्या मागणीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्ष केले नसते, तर या बालकाचा जीव वाचला असता, असा संताप येथील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.