Bangalore Express crushed many passengers: मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. पण समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने त्यांना चिरडल्याची घटना घडली. हा दुर्दैवी अपघात जळगावमधील परांडा स्टेशनजवळ झाल्याची माहिती आहे.

मुंबई : मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. पण समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने त्यांना चिरडल्याची घटना घडली. हा दुर्दैवी अपघात जळगावमधील परांडा स्टेशनजवळ झाल्याची माहिती आहे. या अपघातात पन्नासहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.पुष्पक रेल्वेने अचानक ब्रेक मारल्याने चाकांमधून ठिणग्या उडाल्या. त्यानंतर आग लागल्याची अफवा उडाल्याने रेल्वेतील प्रवासी खाली उतरले. परंतु, दुसऱ्या रेल्वे लाईनवरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवले.
