निवडणुकीच्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मंगरूळपीर  : नगरपरिषद निवडणुकीच्या कारणावरून लोखंडी शस्त्रांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मंगरूळपीर  : नगरपरिषद निवडणुकीच्या कारणावरून लोखंडी शस्त्रांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोहम्मद अली मोहम्मद याकूब (रा. बिलाल नगर, मंगरूळपीर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,   १४ रोजी रात्री दीड ते तीन वाजेदरम्यान त्यांचा भाऊ मोहम्मद तारीक मोहम्मद याकूब व शाहरुख अहमद खान हे मंगरूळपीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून मोटारसायकलने घरी परतत होते. यावेळी मीर आशिक अली कार्यालयासमोर रस्त्यावर आरोपी मोहम्मद मुजमील अब्दुल रफिक, मोहम्मद मुस्तकिन अब्दुल रफिक व फाजील खान नय्यर खान (सर्व रा. मंगरूळपीर) यांनी संगनमत करून नगरपरिषद निवडणुकीच्या वादातून लोखंडी तलवार, लोखंडी पाईप व लाकडी बांबूच्या काठ्यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या भावावर तसेच शाहरुख अहमद खान यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »