पैठण : नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात पैठण येथील आर्य चाणक्य प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाची विशेष दखल घेण्यात आली. आर्य चाणक्य प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी व कामगार सहाय्यक यंत्र विज्ञान प्रदर्शनात सादर केले होते. यावेळी अमेरिकेच्या कन्सोर्टियम फॉर ग्लोबल एज्युकेशन (सीजीई) च्या अध्यक्षा कॅरोलिन बिशप यांनी विज्ञान प्रदर्शनास भेट देवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात पैठण येथील आर्य चाणक्य प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी व कामगार सहाय्यक यंत्र सादर केले होते. हे यंत्र शेतकरी व कामगारांचे शारीरिक श्रम कमी करुन कामाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अमेरिकेच्या कन्सोर्टियम फॉर ग्लोबल एज्युकेशन (सीजीई) च्या अध्यक्षा कॅरोलिन बिशप यांनी विज्ञान प्रदर्शनास भेट देऊन आर्य चाणक्य प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगाची माहिती त्यांच्याकडून घेतली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टीकोनाचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थी शिवेंद्र काकडे, शिक्षक सर्फराज अंबेकर, मनोज शिंगारे आदींची उपस्थिती होती. आर्य चाणक्य प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची दखल राज्यस्तरीय प्रदर्शनात घेतल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यााचे कौतुक केले.