वैजापूर : तालुक्यातील खंडाळा येथे युवकाच्या दोन गटातील वादातून चाकुने हल्ला करून तिघांना भोसकले. ही घटना 12 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खंडाळा येथे घडली. या घटनेमुळे खंडाळा व वैजापूर येथे तणाव निर्माण झाला आहे. खंडाळा गावातील एकाच्या दुकानातील साहीत्य बाहेर काढून संतप्त जमावाने पेटून दिले.तर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.

पोसिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मोईन मुक्तार शहा (२४ वर्ष) या युवकाचा मृत्यू झाला. तर शेख अबरार आरीफ शेख (२३ वर्ष) व शोएब असीम पठाण (२३ वर्ष) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांवर वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, या घटनेतील आरोपींची नावे अद्याप समजली नाही. परंतु तालुक्यातील भायगाव येथील अनर्थे नावाच्या युवकाच्या दुकानातील सलून चे साहीत्य बाहेर काढून जमावाने रस्त्यावर पेटून दिले. रूग्णालयातही संतप्त जमावाने तोडफोड केली. उपजिल्हा रुग्णालयात काचा, टेबल, कागदपत्रे याची संतप्त जमावाने तोडफोड केली. या घटनेमुळे खंडाळा गावात व वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.