Akola vote counting: अकोला विधानसभेच्या पाचही मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्या अकोला पूर्म मतदारसंघामध्ये भाजपाचे रणधिर सावरकर, तर अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठान आघाडीवर आहेत.
अकोला : अकोला विधानसभेच्या पाचही मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्या अकोला पूर्म मतदारसंघामध्ये भाजपाचे रणधिर सावरकर, तर अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठान आघाडीवर आहेत.
अकोला पूर्व मतदारसंघातील मतमोजणीच्या पहिल्या सहा फेऱ्यांमध्ये भाजपाचे उमदेवार रणधिर सावरकर यांनी २१ हजार ६३४ मतांनी आघाडी मिळवली आहे. तर दुसऱ्या स्थानावर गोपाल दातकर यांना १९ हजार ६६५ मत मिळाली आहेत. अकोला पश्चिम मतदारसंघात पहिल्या फेरीत साजिद खान पठान यांनी ४ हजार ७४६ मतांची आघाडी, तर भाजपाचे विजय अग्रवाल यांना २ हजार ७७३ मते मिळाली आहेत. हरिष आलिमचंदानी यांना १ हजार ५३ मते मिळाली आहेत.