अकोला आणि बुलढाणा लाचलुचपत विभागाने तीन लाचखोर तलाठ्यांच्या आवळल्या मुसक्या: शेगावच्या दोन तर बाळापूर येथील एका तलाठ्यास लाच घेताना केली अटक

शेगाव :  अकोला आणि बुलढाणा लाचलुचपत विभागाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा कारवाई करत तीन लाचखोर तलाठ्यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याचे कारवाई केली आहे. यामध्ये अकोला लाचलुचपत विभागाने गौण खनिजाची वाहतुक करणारे तीन वाहन सोडण्यासाठी 50 हजाराची लाच घेतांना शेगाव येथे दोन तलाठ्यांना रंगेहाथ पकडले तर दुसऱ्या कारवाईत बुलढाणा लाचलुचपत विभागाने अकोला जिल्ह्यातील बाळापूर तहसीलच्या एका तलाठ्यास 1 लाखांची लाच स्विकारतांना गजाआड केले आहे. या कारवाईमुळे शेगाव आणि बाळापूर महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

शेगाव तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेल्या माटरगाव येथे तलाठी अरूण गुलाबसिंग डाबेराव (57) व अमोल सोपान गिते (36) दोघे रा. शेगाव यांनी 10 सप्टेंबर रोजी रात्री माटरगाव येथे तक्रारदाराचे जेसीबी आणि दोन टिप्पर पकडून तहसील कार्यालयाला लावण्याची धमकी दिली. तसेच कारवाई न करण्यासाठी दोघांनी  तक्रारदाराला 50 हजाराची लाचेची मागणी केली. यावेळी तक्रारदाराने कारवाईच्या दिवशी 19 हजार रूपये तलाठी अरूण डाबेराव याला दिले. व उर्वरीत रक्कम दुसऱ्या दिवशी आणून देण्याचे ठरले. यावेळी तक्रारदाराने लाचेची रक्कम न देण्याचे ठरवून अकोला लाचलुचपत विभागात 11 सप्टेंबर रोजी उपरोक्त दोघांची तक्रार केली. तक्रारीवरून 22 सप्टेंबर रोजी अकोला लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा कारवाई करून पडताळणी केली असता तलाठी अरूण डाबेराव आणि तलाठभ अमोल गिते यांनी तक्रारदाराकडून उर्वरीत 20 हजार लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. परंतु दोन्ही आरोपींना तक्रारदारावर संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्विकारण्यासाठी टाळाटाळ केली. यावरून पथकाने 30 सप्टेंबर रोजी उपरोक्त दोन्ही तलाठ्यांना ताब्यात घेवून त्यांचेविरूध्द शेगाव शहर पोस्टेमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

बुलढाणा एसीबीने बाळापूर तहसिलच्या तलाठ्यास 1 लाखाची लाच घेतांना पकडले

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तहसिल अंतर्गत असलेल्या शेतीचा गट क्रमांक दुरुस्त करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच स्वीकारतांना तलाठी सतिश कराड यास शेगाव- बाळापूर मार्गावरील निंबा फाटा ता. बाळापूर येथे बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सदर कारवाई 29 सप्टेंबर रोजी करण्यात आली. तक्रारदार यांनी 23 सप्टेंबर रोजी ॲन्टी करप्शन ब्युरो, अकोला येथे तक्रार दिली की, त्यांनी 2024 मध्ये कारंजा रमवानपूर शिवारामध्ये शेती खरेदी केली होती. सदर शेतीचा गट क्रमांक दुरुस्ती करण्यासाठी तहसिल कार्यालय बाळापूर जि. अकोला येथील तलाठी सतिश सुभाष कराड हा लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार दाखल केली होती. 24 सप्टेंबर रोजी पडताळणी कार्यवाही दरम्यान तलाठी सतिश कराड याने तक्रारदारास 1 लाख 25 हजार रुपये लाचेची मागणी करीत तडजोडीअंती 1 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »