चाकूच्या धाकावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला बेड्या: पोलिसांचा पाच हजार किलोमीटरचा प्रवास आरोपीला इंदूर येथून अटक

अकोला: घरात कोणी नसतांना एका अल्पवयीन मुलीवर चाकूच्या धाकावर अत्याचार करणाऱ्या तैहिदखान समिर खान बैद (२८) रा.खैर महम्मद प्लॉट डाबकी रोड याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक केली आहे. शनिवार ६  सप्टेंबर रोजी याप्रकरणी डाबकी रोड पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अकोला: घरात कोणी नसतांना एका अल्पवयीन मुलीवर चाकूच्या धाकावर अत्याचार करणाऱ्या तैहिदखान समिर खान बैद (२८) रा.खैर महम्मद प्लॉट डाबकी रोड याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक केली आहे. शनिवार ६  सप्टेंबर रोजी याप्रकरणी डाबकी रोड पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जुने शहरातील रहिवाशी असलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबातील सर्वजण हे ६ सप्टेंबर रोजी शहरातील गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेले होते.घरात पीडिता ही एकटीच असल्याचे पाहून आरोपी तौहिद खान समीर खान याने चाकूच्या धाकावर या अल्पवयी तरुणीवर अत्याचार केले. त्यानंतर पीडीतेच्या कुटुंबाने डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. पोलिसांनी त्यानंतर हे प्रकरण गांभीर्याने घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथकाची द्वारे विविध राज्यात शोध मोहीम राबविली अखेर सहा दिवसानंतर आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून लोकप्रतिनिधींनी देखील आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी या घटनेचा निषेध म्हणून हिंदू जन आक्रोश मोर्चाचे देखील आयोजन केले आहे.

यांनी केली कारवाई

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके सा. स्थानिक गुन्हे शाखा, स.पो.नि. विजय चव्हाण, गोपाल ढोले, पो.उप.नि. गोपाल जाधव, माजीद पठाण, विष्णु बोडखे व पो. अमंलदार दशरथ बोरकर, शेख हसन, फिरोज खान, अब्दुल माजीद, वसिमोद्दीन, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, किशोर सोनोने, भास्कर धोत्रे, गोकुळ चव्हाण, उमेश पराये, सुलतान पठाण, खुशाल नेमाडे, एजाज अहेमद, श्रीकांत पातोंड, राहुल गायकवाड, मोहम्मद आमीर, आकाश मानकर, राज चंदेल, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, स्वप्नील खेडकर, अन्सार अहेमद, स्वप्नील चौधरी अशोक सोनवणे, सतिश पवार,प्रशांत कमलाकर, तसेच सायबर शाखेचे पो.अं. गोपाल ठोंबरे, आशिष आमले, राहुल सानप, स्वप्नील दामोदर, गणेश कुहिले यांनी केली.

आरोपीजवळ मोबाईल नसल्याने येत होत्या तांत्रिक अडचणी

आरोपी तौहीद खान समीर खान याने स्वतःचा मोबाईल हा सुरत येथील बहिणीकडे ठेवून तो पाच दिवस सतत प्रवासात होता.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सुरत, अहमदाबाद, दिल्ली, आग्रा, झांसी, भोपाळ, गुना, लिलितपुरा,शिवपुरी, उज्जैन, देवास असा प्रवास करून तो मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका नातेवाईकाकडे पोहोचला तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी येथून त्याला अटक केली. माहितीनुसार सिटी कोतवाली, डाबकी रोड, रामदास पेठ पोलीस स्टेशन मध्ये यापूर्वी सहा गुन्हे या आरोपीवर दाखल आहेत.

पोलिसांचा पाच हजार किमी चा प्रवास

आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी चार चाकी, रेल्वे, विमान, ऑटो, बसद्वारे तब्बल पाच हजार किलोमीटरचा प्रवास केला.२५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. याशिवाय बारा विविध ट्रेनमध्ये देखील तपासणी केली.तसेच विविध उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली या राज्यातील विविध शहरात हॉटेल, दर्गा,रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, लॉज, आदी ठिकाणची पोलिसांच्या पथकाने तपासणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »