छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयात प्रवेश नसलेल्या 1 हजार 416 विद्यार्थ्यांची बनावट कागदपत्रे तयार करुन पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम या योजनेच्या पोर्टलवर टाकली. या विद्यार्थ्याच्या नावे शासनाचा तब्बल 6 कोटी 53 लाख 16 हजारांचा निधी गेल्या तीन वर्षात लाटण्यात आल्याचा धक्कादाक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहा महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी आणि एजंटावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी चेतना दौलत मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सहाय्यक आयुक्त आदिवासी विकास अमरावती एस. आर. पेढेकर यांच्या चौकशी समितीने अहवाल दिला. अहवालानुसार पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम या योजने अंतर्गत सन 2022-23, 2023-24 व सन 2024-25 या वर्षात सहारा शिक्षण संस्थेअंतर्गत चालणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलेजचे प्राचार्य सय्यद अरशद अफसर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आटर्स, कॉमर्स व विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य खलील पठाण, महाविद्यालयाचे लिपीक महेश रघुनाथ पाडळे, समीर शामीर पठाण, व इतर संबंधित अधिकारी-कर्मचारी, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे लिपीक अविनाश मुर्डे तसेच बनावट लाभार्थी व इतर मध्यस्थी एजंट, तसेच प्रकल्प कार्यालय, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर व इतर चेतना शिक्षण संस्थेचे कला वरिष्ठ महाविद्यालय, सावंगी बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयाचे प्राचार्य, संबंधीत कर्मचारी व इतर यांनी कट रचुन संगनमत करुन स्वयंम ऑनलाईन प्रणालीचा दुरुपयोग केला. त्यांच्या महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्या 1 हजार 416 विद्यार्थ्यांची बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारे महाविद्यालयात 1 हजार 416 बनावट विद्यार्थी स्वयंम योजनेच्या पोर्टलवर दर्शवून सुमारे 6 कोटी 53 लाख 16 हजार 50 रुपयांची शासनाची आर्थिक फसवणुक करुन नुकसान केले आहे.
अशी आहेत आरोपींची नावे
प्राचार्य सय्यद अरशद अफसर, प्रभारी प्राचार्य खलील पठाण, महेश रघुनाथ पाडळे, समिर शामीर पठाण, अविनाश मुर्दे, बनावट लाभार्थी संदीप रामदास गवळे, परमेश्वर अशोक सोनवणे, राहुल नंदु साळवे, रविंद्र नंदु साळवे, कैलास श्रीपत गवळे, पल्लवी कैलास गवळे, महेश रघुनाथ पाडळे, स्वाती रघुनाथ पाडळे, मध्यस्थी करणारे एजंट, चेतना शिक्षण संस्थेचे प्राचार्य व कर्मचारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला प्राचार्य व कर्मचारी अशी आरोपींची नावे आहेत.