विवाहिततेचा विहिरीत पडून मृत्यू; मोहळई येथील घटना

सावंगी अवघडराव :  भोकरदन तालुक्यातील मोहळई गावच्या शिवारात विहिरीत पडून ३० वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सावंगी अवघडराव :  भोकरदन तालुक्यातील मोहळई गावच्या शिवारात विहिरीत पडून ३० वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अर्चना रमेश शिंदे (वय ३०, रा. मोहळई, ता. भोकरदन, जि. जालना) असे मृत महिलेचे नाव आहे. गुरुवारी, १८ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास मोहळई शिवारातील द्वारकाबाई शिंदे यांच्या शेतातील गट क्रमांक १२९ येथील विहिरीत अर्चना शिंदे पडल्याने त्या पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत भागवत रामदास शिंदे (वय ४६, रा. मोहळई) यांनी १९ डिसेंबर  रोजी  पारध पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »