A grand rally in Washim attracted attention : वाशिम येथे महारॅलीने वेधले लक्ष ; जागतिक एड्स दिन

A grand rally in Washim attracted attention

A grand rally in Washim attracted attention : जागतिक एड्स दिनानिमीत्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिम च्या वतीने दिनांक ०२ डिसेंबर २०२२ रोजी वाशिम शहरातुन एड्स जन जागृतीकरीता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.

A grand rally in Washim attracted attention

वाशिम : जागतिक एड्स दिनानिमीत्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिम च्या वतीने दिनांक ०२ डिसेंबर २०२२ रोजी वाशिम शहरातुन एड्स जन जागृतीकरीता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅली मधे हजारो विद्यार्थी आणि शहरातील सामाजिक संघटनेने सहभाग नोंदवून रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद दिल्यामुळे या रॅलीला महारॅलीचे स्वरूप आले.
सदर रॅलीला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे, शासकीय वैदयकीय महाविदयालय वशिम चे अधिष्ठाता डॉ मेश्राम , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ठोंबरे , जिल्हा न्यायधीश व्हि. के. टेकवानी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रुईकर, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अविनाश झरे, , डॉ अविनाश पूरी अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक, वैदयकीय अधिकारी नोडल अधिकारी डॉ. बालाजी हरण, डॉ हरीदास मुंडे रक्तसंक्रमण अधिकारी, जिल्हा माहीती अधिकारी श्री चव्हाण सर च्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रॅलीला हिरवी झेंडी देऊन सुरुवात करण्यात आली.
या दरम्यान श्रीमती सरीता चव्हाण आणि श्रीमती सखु हजारे, श्रीमती सिरसाट जिल्हा स्त्रि रुग्णालय वाशिम, श्रीमती आरती ताथोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये वाशिम जिल्हयातील एआरटी केंद्रतील रुग्णाविषयीची सविस्तर माहीती सांगितली त्यामध्ये एकूण एआरटी रुग्ण नोंदणी ३७८२, एआरटी औषधिवर असणारे रुग्ण २०२२, एआरटीवर नोंद असलेल्या एचआयव्ही बाधित गरोदर माता १८२ तर एच आय व्ही बाधित बालके २६६ एव्हढया रुग्णांची नोंद झालेली आहे. मागील चार वर्षात आयसीटीसी मध्ये एच आय व्ही तपासणी केलेले रुग्ण १४२९०५ आहेत. अशी सविस्तर माहिती मा. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी दिली.

दरम्यान महाविदयालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागाने विविध पथनाटय व गितांचे आयोजन करण्यात आले तसेच एचआयव्ही/ एडस या माहितीचे हस्तपत्रकांचा व एचआयव्ही प्रतिबंधक निरोध वाटप करण्यात आले. लोककलेच्या माध्यमातुन महात्मा फुले अणि शाहीर संतोष खडसे यांच्या चमुसह जनजागती करण्यात आली सदर रॅलीत विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रचंड प्रमाणात उपस्थिती होती. तसेच त्यांना सहभागाचे प्रमाणत्र देण्यात आली. या रॅलीमध्ये श्री सरस्वती समाजकार्य महाविदयालय, श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविदयालय, सावित्रीबाई फुले महाविदयालय, सावित्रीबाईफुले नर्सिंग मॉ गंगा नर्सिंग स्कुल, नॅझरीन नर्सेस ट्रेनिंग कॉलेज, मदर टेरेसा नर्सिंग कॉलेज, शासकीय नर्सिंग कॉलेज, श्री तुळशीरामजी जाधव महाविदयालय, शासकीय वैदयकीय महाविदयालय, राधा देवी बाकलीवाल विदयालय, गोटे महाविदयालय वाशिम, चे विदयार्थी व प्राध्यापक वृद. श्री. गुणवंत शिक्षण संस्था. ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक व बहुऊदर्शिय सस्था, विहान प्रकल्प वाशिम, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, नेहरु युवा केंद्र जिल्हा वाहतुक शाखा आणि वरीष्ठ व कनिष्ठ महाविदयालये, आणि सामजिक संस्थाचे ऊत्तम सहकार्य मिळाले.

कार्यक्रमाचे यशस्वीकरणासाठी जिल्हा पर्यवेक्षक रवि भिसे यांनी अथक परीश्रम केले. सुत्रसंचालन समुपदेशक पंढरी देवळे, मिलींद घुगे यांनी आभार प्रदर्शन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ अनिल कावरखे यानी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरीता डी आर मनवर, विनोद रत्नपारखी, अनिल राठोड, निलेश अल्लाडा, श्रीमती आगाशे, श्रीमती अवचार, श्री मेसरे, श्रीमती मोरे आणि जिशा वरीद, बाबाराव भगत, स्वप्नील सरनाईक व टि आय चमु, श्री. शांताराम गायकवाड व लिंक वर्कर चमु नितीन व्यवहारे, श्रीमती आरु मॅडम, चंद्रशेखर भगत, रुपेश भगत, श्री भालेराव, जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारीनी सुध्दा अथक परीश्रम घेतले तसेच पोलीस प्रशासनाने रॅलीच्या मार्गाचे उत्तम नियोजन केले व मोलाचे सहकार्य लाभले तसेच पत्रकार बांधव यांचे सुदधा मोलाचे आणि अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »