मुंबई : या निवडणुकीत विकासाचा अजेंडा घेऊन गेलो. याच विकासाच्या अजेंडाला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे. लोकांना विकास हवा आहे म्हणून त्यांनी आपल्याला निवडून दिले आहे. या निकालाने आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे, जनतेचा विश्वास हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. बाळासाहेब ठाकरे यांचेही मी स्मरण करतो, कारण त्यांचा आशीर्वाद हा आपल्याच पाठीशी होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

महानगर पालिका निवडणुकीतील विजयानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपच्या कार्यालयात जाऊन निवडून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती आघाडीवर आहे, तर काही ठिकाणी कॉंग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत ठाकरे बंधूंच्या जोरावर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची देखील चांगली कामगिरी दिसून येत असली तरी भाजप आणि महायुती आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. यावेळी एकच जल्लोष पाहायला मिळाला. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचा अजेंडा हा विकासच असणार आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे सगळे करत असताना ही गोष्ट सांगितली पाहिजे, आमचा जो कार्याचा आत्मा आहे, जो विचारांचा आत्मा आहे, हा हिंदुत्ववादीच आहे. हिंदुत्व आणि विकास यांना वेगळे करता येणार नाही. लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी निवडून आलेल्या कार्यकर्त्यांना दिला.