dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला; घात की अपघात? 

बुलढाणा : मोताळा तालुक्यातील कोथळी शिवारात एका ३२ वर्षीय तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शनिवार, १७ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. 

बुलढाणा : मोताळा तालुक्यातील कोथळी शिवारात एका ३२ वर्षीय तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शनिवार, १७ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. 

फारुख शाह सलीम शाह (३२वर्ष) असे मृतकाचे नाव असून ते अकोला येथील रहिवासी असल्याचे समजते. शनिवारी सायंकाळी कोथळी येथील इस्माईल शाह हे आपल्या शेताकडे जात असताना शेत शिवारात एमएच ३० बी यु ७२४६ क्रमांकाची दुचाकी रस्त्याच्या एका कडेला पडलेली दिसली, इतकेच नाही तर फारुख शाह यांचा मृतदेहही  आढळून आला. यानंतर, कोथळी गावात ही बातमी पसरली. दरम्यान, बोराखेडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर तपासचक्रे फिरली. मृतदेह बुलढाणा येथील सामान्य रूग्णालयाकडे हलविण्यात आला. यानंतर मृतक तरुणाचे नातेवाईक हे दाखल झाले. मृतकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव होताना दिसून आला. हा अपघात आहे की, घात? हा प्रश्न अनोत्तरीत आहे. मात्र, पोलीस प्रशासन यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top