dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जालन्यात भाजपची मुसंडी; पाच प्रभागात 20 उमेदवार विजयी; महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवारांचा केला पराभव

जालना : पहिल्यांदाच निवडणूक झालेल्या जालना शहर महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या भाजपाने आतापर्यंतच्या निकालात जोरदार मुसंडी मारली आहे. पहिल्या प्रभागात भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे आणि बहिणी सुशीला दानवे यांनी विजय मिळवला. याशिवाय प्रभाग 5 आणि 14 मध्येही भाजपाचे आठही उमेदवार विजयी झाले. 

    जालना शहर महानगरपालिकेची निवडणूक भाजप, शिवसेनेने पहिल्यापासून प्रतिष्ठेची केली होती. त्यानुसार प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. दरम्यान, आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारी साडेबारापर्यंत हाती आलेल्या काही प्रभागांच्या अंतिम निकालात भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून आले आहे. पहिल्या प्रभागात भाजपाचे कल्याण भदनेकर, ज्योती सले, सुशीला दानवे, पद्मा  मानधनी, भास्कर दानवे हे पाचही उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे या उमेदवारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना मात दिली. त्यानंतर प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपाचे ॲड. रीमा खरात,

अशोक पांगारकर, सुलोचना गोरडे, शशिकांत घुगे, प्रभाग 5 मध्ये भाजपाचे अक्षय गोरंट्याल,अनिता घोडवे, माया जोशी,अजय भरतीया, प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपाच्या भाग्यश्री जोगस,महेश निकम, अनामिका पांगारकर यांनी विजय मिळवला. तर माजी नगरसेवक असलेले भाजपचे ज्ञानेश्वर ढोबळे यांना अपक्ष उमेदवार श्रीकांत पांगारकर यांनी मात देऊन विजय मिळवला आहे. 

»  प्रभाग क्रमांक 10 ने काँग्रेसला तारले

हाती आलेल्या अंतिम निकालात प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेसचे 3 उमेदवार निवडून आले आहेत. यात आसिफ अन्सारी, फरहाना अन्सारी, अमजद खान यांचा समावेश असून भाजपच्या कार्तिका इंगळे यांनी विजय मिळवला आहे. या प्रभागाने काँग्रेसला तारले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top