dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

खामगाव रत्न पुरस्कार खंडेराव यांना तर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला खामगाव गौरव

खामगाव :  खामगाव प्रेस क्लबच्यावतीने शहरातील स्थानिक पत्रकार भवनात 6 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक, पत्रकारिता व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी खामगाव रत्न पुरस्कार समाजसेवक संजय खंडेराव यांना प्रदान करण्यात आला, तर स्व. बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्कार पत्रकार अनिल खोडके यांना देऊन गौरविण्यात आले.

खामगाव :  खामगाव प्रेस क्लबच्यावतीने शहरातील स्थानिक पत्रकार भवनात 6 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक, पत्रकारिता व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी खामगाव रत्न पुरस्कार समाजसेवक संजय खंडेराव यांना प्रदान करण्यात आला, तर स्व. बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्कार पत्रकार अनिल खोडके यांना देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास काँग्रेस नेते ज्ञानेश्वर पाटील, वंंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक सोनोने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राणा दिलीपकुमार सानंदा, उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, तहसीलदार सुनील पाटील, अमोल अंधारे, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत रेठेकर, खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर भोसले, ज्येष्ठ पत्रकार डॉ. राजेश राजारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापनात विशेष कार्य करणाऱ्या संजय खंडेराव यांना खामगाव रत्न पुरस्कार देण्यात आला. खंडेराव यांचा परिचय नाना हिवराळे यांनी करून दिला. तर खामगाव गौरव पुरस्कार क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळास देण्यात आला. हनुमान व्यायाम मंडळाचा परिचय पत्रकार अनुप गवळी यांनी दिला. तर स्व. बाळासाहेब बिन्नीवाले पुरस्कार पत्रकार अनिल खोडके यांना देण्यात आला, त्यांचा परिचय श्रीधर ढंगे यांनी दिला. त्याचवेळी खामगाव प्रेस क्लबचा युवा प्रेरणा पुरस्कार युवा पत्रकार सूरज बोराखडे यांना प्रदान करण्यात आला. त्यांचा परिचय सुनिल गुळवे यांनी करून दिला. यावेळी सत्कारमूर्ती संजय खंडेराव, अनिल खोडके, सूरज बोराखडे तर हनुमान व्यायाम मंडळाच्यावतीने चंद्रकांत रेठेकर यांनी सत्काराला उत्तर देताना मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पीएचडी मिळाल्यामुळे डॉ. राजेश राजोरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार सतीशआप्पा दुडे, नवनिर्वाचित नगरसेविका ज्योती श्रीकांत भुसारी, तहसीन शाह यांचा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. राजेश राजोरे यांनी प्रास्ताविक केले. अनिल गवई यांनी सूत्रसंचालन केले, तर किशोर आप्पा भोसले यांनी आभार मानले. या सोहळ्यास खामगाव प्रेस क्लबचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top