dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

खून प्रकरणातील आरोपी अटकेत ; छत्रपती संभाजीनगर येथून घेतले ताब्यात 

बुलढाणा : जानेफळ पोलीस ठाणे हद्दीत अपहरण करून निघृण खून करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत देशभर वावर करणारा अमोल जयसिंग राजपूत (वय ३८, रा. जानेफळ) याला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. 

तक्रारदार इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ जून २०२४ रोजी त्यांचे पती दिलीप इंगळे यांचे अपहरण करून त्यांना अहमदनगर येथे नेण्यात आले. आरोपी अमोल राजपूत व त्याच्या साथीदारांनी संगनमताने या घटनेनंतर दिलीप इंगळे यांचा निघृण खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी अटकेत असून, मुख्य सूत्रधार मात्र फरार होता. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर फरार गुन्हेगारांविरोधात कडक धोरण अवलंबले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना देत तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबविण्यात आली. अमोल राजपूत हा वेशभूषा बदलून छत्तीसगड, चंदीगड, कर्नाटक, दिल्ली आदी राज्यांत लपून राहत होता. मात्र तंत्रज्ञान आणि पोलिसांच्या बुद्धीकौशल्यापुढे त्याचे डाव अपयशी ठरले. २७ डिसेंबर २०२५ रोजी तो चंदीगडहून छत्रपती संभाजीनगर येथे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. अखेर ६ जानेवारी  रोजी येथून त्याला एका हॉटेलमधून अटक करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top