dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गावकऱ्यांनी ठोकले जि. प. शाळेला कुलूप 

भरोसा : सहाय्यक शिक्षक अनिल दांडगे यांची नियुक्ती मान्य नसल्यामुळे मिसाळवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी जि. प. शाळेला कुलूप ठोकले. सोमवारपर्यंत नियुक्ती रद्द झाली नाही तर  शाळा समिती सदस्य आणि गावकऱी सीईओंच्या दालनासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

मिसाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर सहाय्यक शिक्षक अनिल दांडगे यांची नियुक्ती करु नये, अशी विनंती ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यामध्ये नमूद करण्यात आले होते की,  शिक्षक अनिल दांडगे यांची नेमणूक आम्हाला मान्य नाही. त्याऐवजी  होतकरु शिक्षकास मिसाळवाडी जि. प. शाळेत नियुक्ती द्यावी. मात्र, तरीही संबंधित शिक्षकाची नेमणूक मिसळवाडी जिल्हा परिषद शाळेवर करण्यात आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत शाळेला कुलूप ठोकले. यावेळी पोलिस पाटील रवी मिसाळ, शाळा समिती अध्यक्ष लक्ष्मण भगत, समाधान मिसाळ, संजय काकडे, सुनील मिसाळ, साहेबराव मिसाळ, मंगेश मिसाळ, रुपेश सुरडकर यांच्यासह ग्रामस्थ हजर होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top