छत्रपती संभाजीनगर : श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर यांच्यातर्फे ६ ते १२ जानेवारी दरम्यान बीड बायपासवरील जबींदा मैदानावर दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत ‘सात दिवसीय दिव्य योग साधना शिबिर’ आणि संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ‘भव्य सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन सर्वधर्मीयांसाठी निःशुल्क करण्यात आले आहे.

परमपूज्य आचार्यश्री शांतीसागरजी गुरूदेव यांचे आचार्य पदारोहण शताब्दी वर्ष तसेच तीर्थरक्षा शिरोमणी आचार्य आर्यनंदीजी महाराज यांच्या २५ व्या समाधी वर्षाचे औचित्य साधून कुंथुगिरी तीर्थप्रणेता गणाधिपती गणधराचार्य श्री कुंथुसागरजी गुरूदेव यांच्या मंगल सान्निध्यात हा सोहळा होणार आहे. राष्ट्रसंत आचार्यश्री गुणधरनंदीजी गुरूदेव यांचे मार्गदर्शन होणार आहे. विशेष म्हणजे, हरिद्वारचे प्रसिद्ध योगगुरू रामदेव बाबा दररोज योगसाधना घेणार आहेत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मंत्री संजय शिरसाट व अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक व खा. पद्मभूषण डॉ. वीरेंद्र हेगडे यांचा नागरी सत्कार करणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत दिली. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन सकल मारवाडी महासभा, सकल जैन समाज व सकल हिंदू जनजागरण समितीतर्फे करण्यात आले आहे. यशस्वितेसाठी पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी, सचिव प्रकाश अजमेरा, अरुण पाटणी, किरण पहाडे, ललित पाटणी, जितेंद्र पाटणी, संतोष सेठी, महावीर ठोळे यांच्यासह अनेकजण प्रयत्न करत आहेत.