dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जालना जिल्ह्यातून दोन बांगलादेशी घुसखोरांची मायदेशी रवानगी

धावडा : बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना जालना पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेनंतर मायदेशी रवाना केले आहे. जिल्हा विशेष शाखेने या घुसखोरांना पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्याच्या सीमेवर नेऊन सीमा सुरक्षा दलाच्या ताब्यात दिले.

धावडा : बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना जालना पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेनंतर मायदेशी रवाना केले आहे. जिल्हा विशेष शाखेने या घुसखोरांना पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्याच्या सीमेवर नेऊन सीमा सुरक्षा दलाच्या ताब्यात दिले.

इमदार हुसेन मोहम्मद उली अहमद उर्फ सिपॉन (२६) आणि हुमायुन कबीर मोहम्मद उली अहमद (४०) हे दोघे पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना राहत होते. त्यांच्यावर 27 डिसेंबर २०२४ रोजी पारध पोलीस ठाण्यात पासपोर्ट कायदा आणि परकीय नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा आणि २ हजार ५०० रुपये दंड ठोठावला होता. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी त्यांना निर्वासित करण्याचे आदेश दिले होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, जिल्हा विशेष शाखेचे पुरुषोत्तम देशमुख, शंकर खरात, भाऊसाहेब लहाणे, प्रतापसिंग सुंदरडे, महिला पोलीस सत्यभामा चव्हाण, पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक नेमाणे, सुभाष जायभाये, गणेश पायघन यांच्या पथकाने केली. जालना पोलिसांच्या या पथकाने दोन्ही बांगलादेशी नागरिकांना पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील बैशनबनगर (१६ माईल) येथील ११९ व्या बटालियन, सीमा सुरक्षा बल मुख्यालयाकडे रविवार, २८ डिसेंबर रोजी सुपूर्द केले. तिथून त्यांना कायदेशीररीत्या बांगलादेशात पाठवण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top