dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

हद्द कायम प्रकरणात भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक लाच घेताना जेरबंद: जालना एसीबी पथकाची बीड जिल्ह्यात कारवाई

जालना : केज ( जि. बीड) येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक माणिक अण्णासाहेब वाघमारे याला जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

जालना : केज ( जि. बीड) येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक माणिक अण्णासाहेब वाघमारे याला जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तक्रारदार शेतकऱ्याने हद्द कायम करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार मोजणी करून शेतजमिनीचे क्षेत्र कमी न करता फाईल निकाली काढण्यासाठी आरोपीने एकूण ३० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. पडताळणीदरम्यान आरोपीने ५ हजार रुपये आधीच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित रक्कम स्वीकारण्यासाठी केज–बीड रस्त्यावरील तहसील कार्यालयासमोरील चहाच्या टपरीजवळ सापळा कारवाई करण्यात आली. आरोपीकडून लाच रक्कम, मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

लाचखोरांची तक्रार करा

नागरिकांनी लाच मागणी झाल्यास टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top