सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील डाभा येथे बिबट्याने गोठ्यात शिरुन हल्ला करीत तीन शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना मंगळवार, 23 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

सोयगाव तालुक्यातील डाभा परिसरातील गट नंबर 22 मध्ये राजू जाधव यांची शेती आहे. राजू जाधव यांनी सोमवार, 22 डिसेंबर रोजी त्यांची जनावरे आणि बकऱ्या शेतातीत गोठ्यात बांधून ठेवली होती. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात शिरुन हल्ला करीत तीन शेळ्या ठार केल्या. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर डाभा परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर सावळदबारा येथील वन विभागाचे वनपाल टी. झेड. सय्यद , वनरक्षक जी. डी. दांडगे, एस.टी.चेके, व्ही. एस. देवकर, पी.ए. गवळी, एस सी मोरे, डी. ए. वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शिवसेना (उबाठा) पक्षाचे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव कोलते यांनी शेतकऱ्यास तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वन विभागाकडे केली आहे.