बुलढाणा : न्यायालयीन अपील दाखल असलेल्या पालिका वगळता राज्यातील इतर नगरपरिषदांसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यानुसार, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा सोडून दहा ठिकाणी 2 डिसेंबला मतदान पार पडले. सुधारित कार्यक्रमानुसार 21 डिसेंबर रोजी सर्व पालिकांचा निकाल लागणार असल्याने पालिका इमारतीत ‘ईव्हीएम’ ठेवण्यात आल्या असून, स्ट्रॉंगरूम बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

आयोगाच्या निर्देशानुसार मतदानप्रक्रिया झाल्यानंतर ईव्हीएम आणि टपाली मतपेट्या पालिका इमारतीतील एका सुरक्षा कक्षात ठेवण्यात आल्या आहेत. आधी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. मात्र काही नगरपालिकामध्ये न्यायालयीन अपीलमुळे त्यासाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. अशा नगरपालिकेसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होईल तर सर्व नगरपालिकांसाठी मतमोजणी 21 डिसेंबरला होईल. त्यामुळे, मतपेढ्या ठेवलेल्या कक्षाबाहेर आणि परिसरात पोलिसांकडून चोख सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार रात्रंदिवस पोलिसांचे दोन पथक पहारा देत आहेत. पालिकानिहाय सुरक्षेसाठी संबंधित ठाणेदार हे प्रभारी अधिकारी आहेत.
अधिकारी, पोलीस कर्मचारी..
स्ट्राँगरूम बाहेर एक पोलीस अधिकारी, 10 पोलिस कर्मचारी तर एक राज्य राखीव दलाची तुकडी असा बंदोबस्त असून रात्रपाळीतही अशीच सुरक्षा आहे. याप्रकारे दोन लेयरमध्ये ही व्यवस्था असून एका पालिकेसाठी दिवसा एक आणि रात्री एक असे दोन अधिकारी तसेच 10 स्थानिक पोलीस असे एकूण 220 पोलीस कर्मचारी पहारा देत आहेत.
सिसीकॅमेरातून नियंत्रण
ईव्हीएम स्ट्रॉंग कक्षासह संपूर्ण परिसर सिसीकॅमेऱ्याच्या निगरानीखाली असून नियंत्रण कक्षातून सर्व बारीक हालचालीवर लक्ष ठेवल्या जात आहे.
ईव्हीएम स्ट्रॉंग रूम सुरक्षेच्या अनुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. रात्रंदिवस बंदोबस्तातील पोलीस कर्मचारी हे सजग असून आपले कर्तव्य बजावत आहेत.
– नीलेश तांबे, जिल्हा पोलीस अधीक्षक