खासदार कल्याण काळे यांच्यावर न्यायालयीन कारवाई करा! ; सकल हिंदू समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

जालना :  गायीच्या कत्तलीच्या  व्हायरल चित्रफितीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते खासदार डॉ. कल्याण काळे यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मंगळवार, 4 नोव्हेंबर रोजी हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन देण्यात आले. 

     ३१ ऑक्टोबर रोजी जालना येथील श्री गुरु गणेश महाराज यांच्या समाधी परिसरात आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात खासदार डॉ. कल्याण काळे यांनी २०२३ मधील गायीच्या कत्तलीचा व्हिडीओ असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे सकल हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या व्हिडीओ संदर्भात पोलिस तपास सुरू असून याबाबत डॉ. काळे यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे  समाजात तणाव निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे कायदा तसेच सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. डॉ. काळे यांनी २०२३ मधील गाय कत्तलीशी संबंधित मुद्यांवर केलेले वक्तव्य अनेक विवाद निर्माण करणारे असून त्यांच्या विधानामुळे समाजात धार्मिक भावना भडकण्याचा धोका आहे, असे यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

 या घटनेबाबत आणि संबंधित व्हिडीओ संदर्भात भारतीय न्याय संहिता 2023 आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) कायद्यांतर्गत तपासणी करून त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

डॉ. काळे वादाच्या भोवऱ्यात

जालना लोकसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, यावेळी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी  विजय मिळवला. यामुळे काँग्रेसचा गेल्या अनेक वर्षांचा राजकीय वनवास संपला. मात्र, स्नेहमिलनाच्या निमित्ताने डॉ. काळे यांनी गणेशोत्सव काळातील कथित गायीच्या कत्तलीच्या चित्रफितीबाबत वादग्रस्त वक्तव्य करून मोठा वाढ ओढवून घेतला आहे. यानंतर त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, याउपरही हे प्रकरण शांत झालेले नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »