छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) सदस्य नोंदणीला विरोध केल्याच्या कारणावरुन वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मकासरे यांच्यासह आठ जणांविरुध्द गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याच्या निषेधार्थ वंचितचा जनआक्रोश मोर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर शुक्रवार, 24 ऑक्टोबर रोजी काढण्यात आला होता. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर, अमित भुईगळ, सिध्दार्थ मोकळे आदींच्या हस्ते पोलिस उपायुक्तांना राष्ट्रध्वज, संविधानाची प्रत आणि कार्यकर्त्यांवर दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यात यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.

क्रांतीचौकातून शुक्रवारी सकाळी अकरा वाजता वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर, अमित भुईगळ, प्रदेश प्रवक्ता सिध्दार्थ मोकळे, फारुख अहमद आदींच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे जावेद कुरैशी, मेघानंद जाधव, भाऊराव गवई, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मकासरे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. क्रांतीचौकातून निघालेला मोर्चा पोलिसांनी जालना रोडवरील चुन्नीलाल पेट्रोल पंपाजवळ बॅरीकेटींग करुन मोर्चा आडवला. यावेळी मोर्चकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय भीम..जय भीम, आरएसएस मुर्दाबाद, संविधानाचा विजय असो अशा घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर, अमित भुईगळ, सिध्दार्थ मोकळे आदींच्या हस्ते पोलिस उपायुक्तांना राष्ट्रध्वज, संविधानाची प्रत आणि कार्यकर्त्यांवर दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यात यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.