छत्रपती संभाजीनगर : अत्यंत वर्दळीच्या गुलमंडीवर विदेशी बनावटीचे पिस्टल घेवून फिरणाऱ्यास सिटीचौक पोलिसांनी शिताफिने सापळा रचून गजाआड केले. रोहीत तुळशीराम बरेलीकर (28 वर्ष), रा. जुना मोंढा, ह.मु. जैन मंदिराजवळ, अरिहंतनगर असे आरोपीचे नाव असून त्याच्याजवळून विदेशी बनावटीचे पिस्टल, एक रिकामे मॅग्झीन असा 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्माला परदेशी यांनी शुक्रवार, 17 ऑक्टोबर रोजी दिली.

अत्यंत वर्दळीच्या गुलमंडीवर रोहीत बरेलीकर हा तरुण विदेशी बनावटीचे पिस्टल घेवून फिरत असल्याची माहिती सिटीचौक पेालिस ठाण्याचे अंमलदार आनंद वाहुळ यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिल्यावर पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलिस आयुक्त सागर देशमुख, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, सहाय्यक फौजदार मुनीर पठाण, पोलिस अंमलदार आनंद वाहुळ, मनोहर त्रिभुवन, प्रविण टेकले, बबन इप्पर आदींच्या पथकाने सापळा रचून गुलमंडी परिसरातून रोहीत बरेलीकर याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ मेड इन युएसए असे लिहिलेले विदेशी बनावटीचे पिस्टल मिळून आले. याप्रकरणी रोहीत बरेलीकर याच्याविरुध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे करीत आहेत.