जलतरण स्पर्धेत संजीवनी अकॅडमीला १५ सुवर्ण, ५ रौप्य व 3 कांस्य पदके; सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

वैजापूर :  येथील संजीवनी अकॅडमीच्या जलतरणपटूंनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत १५ सुवर्ण, ५ रौप्य व ३ कांस्यपदकांची कमाई केली. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जलतरणपटूंची लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रतिनिधीत्व करणार असल्याची माहिती प्रशिक्षक कुहिरे यांनी दिली.

वैजापूर :  येथील संजीवनी अकॅडमीच्या जलतरणपटूंनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत १५ सुवर्ण, ५ रौप्य व ३ कांस्यपदकांची कमाई केली. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जलतरणपटूंची लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रतिनिधीत्व करणार असल्याची माहिती प्रशिक्षक कुहिरे यांनी दिली.

वैजापूर येथील संजीवनी अकॅडमीच्या जलतरणपटूंनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत १५ सुवर्ण, ५ रौप्य व ३ कांस्यपदकांला गवसणी घातली. या स्पर्धेत सिध्दी दिनकर भागवत (१०० मी बटरफ्लाय), रनवीर कमल शर्मा  (४ x १०० मी रिले), विराट रविंद्र आव्हाळे (४ x १०० मी रिले ),  ओंकार  भारत जगताप (४ x १०० मी रिले ), अथर्व तेजस जगताप (४ x १०० मी रिले, डायविंग १ मी), ओंकार सुरजसिंग राजपुत( डायविंग १ मी, १०० मी बटरफ्लाय), नैतिक रूपेष गुडदे (४ x १०० मी रिले), सागरीका गणेश  सोनवणे (डायविंग १ मी), शरण्य जितेंद्र जगताप (१०० मी बॅकस्ट्रोक), जान्हवी कपिल माळोदे (८०० मी फ्री स्टाईल, २०० मी बॅकस्ट्रोक, २०० मी वैयक्तिक, डायविंग १ मी) यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर सिध्दी दिनकर भागवत (२०० मी  वैयक्तिक), अथर्व तेजस जगताप (२०० मी वैयक्तिक), ओंकार सुरजसिंग राजपुत (२०० मी वैयक्तिक), सागरीका गणेश  सोनवणे (२०० मी फ्री स्टाईल), इशा विशाल  पवार (५० मी फ्री स्टाईल) यांनी रौप्य पदक पटकावले.  तर ओंकार भारत जगताप (५० मी ब्रेस्ट,५० मी बटरफ्लाय), नव्या नवनित नारायण (५० मी फ्री स्टाईल) आदींनी कांस्य पदकाची कमाई केली.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या जलतरणपटूंचे संजीवनी ॲकॅडमीचे अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, स्कूलच्या संचालिका निकिता कोल्हे, प्राचार्य प्रविण शेळके, सारीका कुहिरे, डी.एन.शेळके, प्रशिक्षक कुहिरे आदींनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »