भोकरदन : धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त बाधित कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी भोकरदन तालुक्यातून मदतीचा एक ट्रक सोमवारी सकाळी रवाना करण्यात आला. तालुक्यातील सुमारे १० गावांमधून जमा केलेले घरगुती साहित्य या ट्रकमधून पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.

या मदत रथाला नायब तहसीलदार अमोल पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक राजपूत यांनी नारळ फोडूनव हिरवी झेंडी दाखवली. त्यांनी या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी ‘लोकजागर’चे अध्यक्ष केशव पाटील जंजाळ यांनी माहिती दिली की, गेल्या दहा दिवसांपासून कोठा जहागीर, कोळेगाव, माळेगाव, वालसा, बोरगाव जागीर, दावतपूर, ताडकळस, वडशद, तळणी भायडी आणि विरेगाव या गावांमधून हे साहित्य जमा करण्यात आले आहे. यामध्ये जवळपास ९० क्विंटल धान्य, ८३० साड्या, लुगडी, बेडशीट, ताट, तांबे आणि सर्व प्रकारचे किराणा सामान असलेले जवळपास दहा साहित्य किटचा समावेश आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यातील इटकूर, बोरगाव, पिंपळगाव, जवळा, ऐकूरूगा, बळेगाव यांसारख्या अतिपूरग्रस्त गावांमध्ये ही मदत पोहोचवली जाणार आहे.
यावेळी सुभाष पोटे, नामदेवराव पोटे, सुनील साबळे, भागवनराव इच्चे, अशोक इच्चे, उबाळे बाबा, साहेबराव महाराज गावंडे, दगडूबा सुसर, सचिन तेलंगरे, भागवत कानडजे, गजानन कड, नारायण जाधव, भगवान गाढे, राजीव भवर, गौरव कुदर, आदिनाथ सोनवणे, हसन चाऊस आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सामूहिक मदतीचा हात पूरग्रस्त कुटुंबांच्या दिवाळीला नक्कीच आधार देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.