शेततळ्यात बुडाल्याने दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

टेंभुर्णी :  शाळा सुटल्यानंतर शेतात असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 14 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जाफ्राबाद तालुक्यातील वाढवणा तांडा येथे घडली असल्याची माहिती टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या  सूत्रांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम गणेश आढे (11 वर्ष), कुणाल कृष्णा आढे (13 वर्ष), दोघे रा. वाढवणा तांडा, ता. जाफ्राबाद अशी मयत बालकांची नावे आहेत. दोघेही देऊळगाव राजा येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिकत होते. मंगळवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर ओम आढे आणि कुणाल आढे हे दोघेही शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. शेततळ्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून दोन्ही बालकांना बेशुध्दावस्थेत पाण्याबाहेर काढून उपचारासाठी टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी टेंभुर्णी पेालिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस अंमलदार देशपांडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »