काँग्रेस पक्षाचे विचार घराघरात पोहोचवा : डॉ जफर अहेमद खान; नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज

सिल्लोड :  आगामी सिल्लोड नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असून पूर्ण ताकदीने नगर परिषद निवडणूक लढवणार आहे. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात येणार असून काँग्रेस पक्षाचे विचार घराघरात पोहोचविण्यात यावे असे आवाहन सिल्लोड-सोयगाव विधानसभा प्रभारी डॉ. जफर अहेमद खान यांनी रविवार, 12 ऑक्टोबर रोजी केले.

सिल्लोड येथील शासकीय विश्रामगृहात शहर काँग्रेस कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक डॉ जफर अहेमद खान यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, शहराध्यक्ष शेख फेरोज, अल्पसंख्याक जिल्हा चिटणीस कैसर आझाद, ज्येष्ठ नेते शांतीलाल अग्रवाल, महिला तालुकाध्यक्ष जिजाबाई अंभोरे, मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष देविदास दांडगे, युवक अध्यक्ष जाबेर पठाण, युवक विधानसभा अध्यक्ष आवेस आझाद, अश्फाक पठाण, अनवर पटेल, रोहित नाटेकर, शेख शोएब, सुनील आरके, शेख रईस, शेख तौसिफ, शेख सोहेल, गणेश आरके, शेख साजिद, शेख जुबेर, सद्दाम खॉ, संदीप आरके, सुरेश आरके, विजय डोके, सतीश म्हस्के, अमोल म्हस्के, मिलिंद आरके, सय्यद नदीम, समीर पठाण, इम्रान पठाण, शेख जुनेद, शेख वाजेद यांची उपस्थिती होती.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कॉग्रेस पक्ष सज्ज असून ही निवडणूक महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले जनआंदोलन आणि वोट चोरीचा प्रश्न जनतेला १०० टक्के पटला असून, लोकशाही वाचवण्यासाठी तसेच शहराचा विकास करण्यासाठी काँग्रेस ही निवडणूक लढणार आहे. काँग्रेसचे विचार घराघरात पोहचवा असे आवाहन यावेळी डॉ जफर अहेमद खान यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »