पोलिस निरीक्षक मुरली कासार यांच्यावर कारवाई करा : सय्यद तौफिक

छत्रपती संभाजीनगर :  जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील मॉब लिंचिग प्रकरणातील आरोपीचे नाव फिर्यादीत घेऊ नका असे म्हणत फिर्यादीवर दबाव आणणारे जामनेरचे पोलिस निरीक्षक मुरली कासार यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस सय्यद तौफिक यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर :  जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील मॉब लिंचिग प्रकरणातील आरोपीचे नाव फिर्यादीत घेऊ नका असे म्हणत फिर्यादीवर दबाव आणणारे जामनेरचे पोलिस निरीक्षक मुरली कासार यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस सय्यद तौफिक यांनी केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील मॉब लिंचिग प्रकरणातील आरोपी पवन बावस्कर, धनंजय माळी, चेतन नेमाडे यांचे नाव फिर्यादीत घेऊ नका असे म्हणत मयत सुलेमानची बहिण मुस्कानबी जिशान शेख, वडील रहिम खान यांच्यावर जामनेरचे पोलिस निरीक्षक मुरली कासार यांनी फिर्यादीवर दबाव आणला होता. तसेच त्यांनी आरोपीस अटक केली नव्हती. दरम्यान, दसरा सणाच्या निमित्ताने जामनेर शहरात संभाजी भिडे यांच्यावतीने दुर्गा दौडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही तरुणांनी हातात तलवारी घेवून दुर्गा दौडमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळीही पोलिस निरीक्षक कासार यांनी तलवारी नाचवणाऱ्या तरुणांवर कारवाई केली नव्हती. पोलिस निरीक्षक मुरली कासार यांना निलंबित करुन त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस सय्यद तौफिक यांनी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष निसार अहमद, जुबेर मोतीवाला, शेख नईम मॉर्डनवाले यांची उपस्थिती होती.

अधिवेशन काळात मुद्दा उपस्थित करणार : आ. शशिकांत शिंदे

जामनेरचे पोलिस निरीक्षक मुरली कासार यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आगामी हिवाळी अधिवेशन काळात विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस सय्यद तौफिक यांनी सांगितले. तसेच या निवेदनाची प्रत आमदार रोहीत पवार यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »