अंबड : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात संपूर्ण कर्जमाफी व सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी मध्ये बाधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाई पोटी हेक्टरी ५० हजार रुपये, पिक विमाचे निकष पुर्वी प्रमाणे ४ ट्रिगर ठेवण्यात यावे, घरे, पशुधनासाठी जुने निकष न लावता, वाढीव मदत देण्यात यावी आदी मागण्यांसाठी अंबड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी तहसील कार्यालयावर हंबरडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार विजय चव्हाण यांना देण्यात आले.

या हंबरडा मोर्चात उपजिल्हाप्रमुख हनुमान धांडे, माजी तालुका प्रमुख अशोक पाटील बरडे, तालुका प्रमुख दिनेश काकडे, बाळासाहेब गावडे, कुमार रुपवते, विजय सोमाणी, कल्याण टकले, सिद्धेश्वर उबाळे, रजनिस कनके, प्रभु बामणे, अशोकराव खापे, अशोकराव गिरी, उल्हास वाघ, रमेश वराडे,भाऊसाहेब तांबे, अंनिस तांबोळी, गजानन सानप, मुकुंद हुशे, शैलेश दिवटे, शाम राठोड, अंबादास मुळे, रवि इंगळे, संदीप सदावर्ते, सुरेश राणा, महादेव लेकुरवाळे, सुनिल वाकणकर, गोरख डोखे, शिवराम भोजने, बाळासाहेब नारळे, विठ्ठल शिंदे, सिताराम विर, नाथा मिठे, कैलास खरात यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.