छत्रपती संभाजीनगर : विश्वशांतीसाठी सामूहिक भक्तामर स्तोत्राचे येत्या गुरुवार, 9 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जैन पंचायतचे अध्यक्ष महावीर पाटणी यांनी रविवार, 5 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर श्री भक्तामर दिवस साजरा करण्यात येणार असून यासाठी बीड बायपास रोडवरील शाहनूर मियॉं दर्गा पुलाजवळील जबिंदा मैदानावर श्री भक्तामर देशना मंडप उभारण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

जैन धर्माचे महामंगलकारी स्तोत्र असलेल्या ‘श्री भक्तामर स्तोत्रा’ चा जागतिक स्तरावर प्रचार करण्यासाठी आणि संपूर्ण विश्वात शांती, सलोखा स्थापित करण्याच्या उद्देशाने, गुरुवारी आचार्य डॉ. प्रणाम सागर महाराज, विरंजन सागर महाराज, प्रभावसागर महाराज, विपुलमती माता, सुमनप्रभा म.सा., प्रविणा म.सा., आराधनाश्री म.सा., विरतीप्रभाश्री म.सा., पुनीतप्रज्ञाश्री म.सा. आदी साधू-संताच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी भारतासह ब्रिटन, अमेरिका, दुबई, कुवैत, जर्मनी, जपान, साऊथ आफ्रिका आदी देशांतून भाविक ऑनलाईनच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. तसेच ४८ आचार्य भगवंत ऑनलाइन जोडले जाऊन स्तोत्रातील एकेक काव्य पठन करणार आहेत. भारतीय इतिहासात असा योग प्रथमच जुळून येत आहे, हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे.
या सोहळ्यासाठी खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर अंतर्गत सर्व जिनालये, सकल जैन समाज छत्रपती संभाजीनगर आणि श्री भक्तामर प्रभावना रजत वर्षायोग समिती यांनी तयारी केली आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ सकाळी सात वाजता होणार आहे. जाबिंदा ग्राउंडवरील मंडपात २५ हजाराहून अधिक भाविक आणि समाज बांधवांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे महावीर पाटणी यांनी सांगितले.