कालिका स्टीलचे ‘सोशल इंजिनिअरिंग’ ; क्रिएट 2025 तरुण आर्किटेक्ट, अभियंत्यांच्या संकल्पनांना भरारी 

जालना  :   उद्योग हे केवळ नफा कमावण्यासाठी नसतात, तर समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सुद्धा असतात, हे जालना येथील ‘ कालिका स्टील’ ने दाखवून दिले आहे. भगवान विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून ”क्रिएट 2025 ” ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील शेकडो तरुण आर्किटेक्ट, इंजिनियर्स सहभागी झाले. यावेळी प्रथम क्रमांक मिळवलेल्या तीन संघांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. 

विनोद काळे / जालना  :   उद्योग हे केवळ नफा कमावण्यासाठी नसतात, तर समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सुद्धा असतात, हे जालना येथील ‘ कालिका स्टील’ ने दाखवून दिले आहे. भगवान विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून ”क्रिएट 2025 ” ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील शेकडो तरुण आर्किटेक्ट, इंजिनियर्स सहभागी झाले. यावेळी प्रथम क्रमांक मिळवलेल्या तीन संघांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. 

    जालना येथील स्टील असोसिएशनचे अध्यक्ष घनश्याम गोयल यांच्या कालिका स्टील कंपनीच्या वतीने मागील दोन वर्षांपासून ही अभिनव क्रियेटर्स स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, सेलिब्रेटिंग सस्टेनेबिलिटी – अ ट्रिब्युट टू द चेंजमेकरस या  संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत आर्किटेक्चर, सिव्हिल व स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी शाश्वततेचा गौरव करणाऱ्या ट्रॉफी तयार केल्या. त्या ट्रॉफींमध्ये स्टीलचा समावेश केवळ साहित्य म्हणून नव्हता, तर फ्लेक्सिबिलिटी, ट्रान्सफॉर्मेशन व टिकावाचे रूपक म्हणून होता. यावेळी विद्यार्थ्यांनी शिखा शाह, पुरणसिंग राजपूत आणि गौरी मिराशी यांच्यासारख्या मार्गदर्शकांकडून प्रेरणा घेऊन स्टीलच्या साहित्यापासून विविध ट्रॉफी तयार केल्या होत्या. या स्पर्धेत राज्यभरातील एक हजारांहून अधिक संघ सहभागी झाले होते. यापैकी अंतिम ५० संघांनी जालना येथे आयोजित स्पर्धेत आपल्या डिझाईन्स सादर केल्या. यावेळी ख्यातनाम परीक्षक आर्किटेक्ट यतीन पंड्या आणि स्ट्रक्चरल इंजिनिअर संजय जामकर यांनी विद्यार्थ्यांच्या विचारसंपन्नतेचे व सर्जनशीलतेचे कौतुक केले. यावेळी विजेत्या संघातील एका विद्यार्थ्याने सांगितले की, “आम्हाला पहिल्यांदाच स्टील हाताळून त्याची ताकद अनुभवायला मिळाली. हा अनुभव आयुष्यभर स्मरणात राहील.” यावेळी यतीन

 पंड्या म्हणाले, ही स्पर्धा बुकमधील सिद्धांत प्रत्यक्षात आणणारी ठरली. संजय जामकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी डिझाईनमध्ये शाश्वततेला ठोस रूप दिले. यावेळी अनेक मान्यवरांनी स्पर्धकांच्या कल्पकतेने कौतुक केले. 2023 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत यंदा राज्यभरातील विद्यार्थ्यांनी व्यापक सहभाग घेतला. उद्योग क्षेत्रातून सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारी स्वीकारून कालिका स्टीलचे हे सोशल इंजिनिअरिंग शाश्वत भविष्याकडे महत्त्वाची पावले टाकत असल्याचे मत यावेळी विविध वक्त्यांनी व्यक्त केले. 

शाश्वततेची जाणीव 

कालिका स्टीलच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेली क्रिएट ही केवळ एक स्पर्धा नसून पुढच्या पिढीला शाश्वततेची जाणीव करून देणारे व्यासपीठ आहे. आम्हाला खात्री आहे की हीच पिढी भविष्यात शाश्वत बदल घडवेल.

» गोविंद गोयल, संचालक, कालिका स्टील. 

तीन संघांना प्रत्येक 1 लाखांचे पारितोषिक

स्पर्धेत पुणे येथील सीओईपी , अमरावती येथील पी. आर. पोटे पाटील कॉलेज आणि मुंबई येथील ठाकूर कॉलेजच्या संघांनी विजेतेपद पटकावले. या संघांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर तीन संघांना दहा हजार रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »