बुलढाणा : सहकारमहर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांच्या धर्मपत्नी, माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मातोश्री व बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा प्रभावतीकाकू शिंगणे यांचे सोमवारी सायंकाळी 4 वाजेदरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले.

बुलढाणा : सहकारमहर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांच्या धर्मपत्नी, माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मातोश्री व बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा प्रभावतीकाकू शिंगणे यांचे सोमवारी सायंकाळी 4 वाजेदरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 85 वर्षे होते. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार १६ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे पक्षाच्या मोर्चासाठी नाशिकला गेलेले असल्याने अजून अंत्यसंस्काराची वेळ ठरली नाही.
