आयसीटी कॉलेजने केले अवैध उत्खनन : जालना तहसीलदार छाया पवार यांनी केला 9 लाख 60 हजारांचा दंड

जालना :  जिल्ह्यात गौण खनिजांचे बेसुमार अवैध उत्खनन केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यातही जालना तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू आहे. दरम्यान, जालना शहराच्या जवळच असलेल्या रसायन  तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या भूखंडातून अवैध उत्खनन केल्याप्रकरणी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तहसीलदारांनी 9 लाख 60 हजार 750 रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. याआधी एमआयडीसीतील पारशी टेकडी परिसरातील भूखंड मालकाला देखील दीड कोटींच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली होती. 

    जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी डोंगर, टेकड्या तसेच भुखंडातून अवैधरीत्या दगड, माती, मुरूमाचे उत्खनन केले जात आहे. यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शासनाचा कोट्यवधींचा महसूल देखील बुडत आहे. दरम्यान, जालना तालुक्यात आणि विशेषत : जालना शहराच्या परिसरात गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांसाठी माती, मुरुम, दगडांची आवश्यकता भासत असल्यामुळे सर्रासपणे अवैध उत्खनन केले जात आहे. 

   जालना शहराच्या जवळच सिरसवाडी शिवारातील गट क्रमांक 132 मध्ये 80 हेक्टर परिसरात आयसीटी कॉलेजची वास्तू उभारली जाणार आहे. दरम्यान, या भुखंडातून तब्बल 150 ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन करण्यात आल्याचा ठपका ठेऊन जालना तहसीलदार छाया पवार यांनी आयसीटीच्या प्राचार्यांना 9 लाख 60 हजार 750 रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. दोन दिवसात खुलासा मागवला आहे. याबाबत आयसीटी कॉलेजचे प्राचार्य एस. टी. म्हस्के यांना विचारले असता मी एका कार्यक्रमात असून सोमवारी याबाबत माहिती देतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

…तर बोजा टाकण्यात येईल

आयसीटी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दंडाची नोटीस बजावण्यात आलेली आहे. जर त्यांनी दंड भरला नाही तर महाविद्यालयाच्या मालमत्तेवर बोजा टाकण्यात येईल. 

–  छाया पवार, तहसीलदार, जालना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »