सिंदखेड लपाली येथे जावयाची सासुरवाडीत आत्महत्या!

मोताळा : सासुरवाडीत कौटुंबिक वाद झाल्याने विष प्राशन करून जावयाने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना ८ सप्टेंबरच्या दुपारी मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली येथे घडली. 

मोताळा : सासुरवाडीत कौटुंबिक वाद झाल्याने विष प्राशन करून जावयाने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना ८ सप्टेंबरच्या दुपारी मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली येथे घडली. 

  बादल हवसु मंडाळे (रा. कुंभारी, ता. जामनेर जि. जळगाव) असे मृतकाचे नाव आहे.  ‘पत्नीला घेवून येतो’ असे सांगत  मृतकाने सासुरवाडी असलेल्या मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली येथे धाव घेतली. यानंतर, मृतकाच्या नातेवाईकांना माहिती मिळाली. त्यानुसार, बादल याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे लक्षात आले होते. यामुळे मृतकाच्या जवळच्या नातेवाईकांनी तत्काळ सिंदखेड लपाली गाठले व धामणगांव पोलिसांत धाव घेतली. गावातील लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या लोकांसोबत वाद झाल्याने बादल मंडाळे यांनी आत्महत्या केली, असे मृतकाच्या नातेवाईकांनी तक्रारीत  म्हटले आहे. 

पत्नीसह सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हे 

सासरच्या लोकांमध्ये वाद होवून मृतकाने टोकाचे पाऊल उचलले. सहन न झाल्याने सासुरवाडीत आपली जीवनयात्रा संपविली. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास  गावातील एकाला  जावई मृतावस्थेत  आढळला होता. यानंतर एकच खळबळ उडाली. धामणगाव पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन,मृतकाची पत्नी रुपाली मंडाळे, सासरे संजय भंवर, सासू लिलाबाई भंवर,  अक्षय भंवर  (सर्व रा. लपाली ता. मोताळा) यांच्यावर गुन्हे दाखल केले असून  प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल वरारकर करीत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »