बुलढाणा : परराज्यातून आलेल्या वाहन चालकाकडून जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या ५ पोलीस वाहतूक पोलिसांविरुद्ध काल चिखली पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाल्यानंतर, याप्रकरणी पोलीस विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी “त्या” ५ पोलिसांना निलंबित करण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला आहे. २४ तासातच पोलिसांनाच निलंबनाचा तडाखा निलेश तांबे यांनी दिला आहे.

कर्नाटकातून आलेल्या चित्रपट निर्माते व सहकाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून दोन पोलिसांनी एका चहा टपरीवाल्याकडे ऑनलाइन पेमेंट करून घेतले, तर तीन वाहतूक पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पुन्हा पैशाची मागणी केली. यात त्या निर्मात्याच्या गाडीचा अपघातही झाला, दरम्यान या प्रकरणी ताज अ. रहमान यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता तर पोलिसांनी चिखली पोस्टेचे अभय टेकाळे, जिल्हा वाहतूक शाखेचे गजानन भंडारी आणि महामार्ग मदत केंद्राचे विठ्ठल काळुसे, विजय आंधळे आणि संदीप किरके यांच्यावर ६ ऑगस्ट रोजी भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणी आज गुरुवार सात आगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने त्या पाचही अंमलदार यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यात पोहेकॉ/ ११९८ गजानन भंडारी जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा बुलढाणा, पोकॉ/ २५४४ अभय टेकाळे पोलीस स्टेशन चिखली तर पोकॉ/ ८१९ विठ्ठल काळुसे, पोकॉ/१०६९ संदीप फिरके, पोका/ ३०६ विजय आंधळे या तिघांची तत्कालीन नेमणूक महामार्ग पोलीस मदत केंद्र मलकापूर, सध्या नेमणूक पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा.. या सर्वांना पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने निलंबित करण्यात आले असून त्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय बुलढाणा ठेवण्यात आले आहे