उत्तराखंड : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली येथे ढगफुटीमुळे खीर गंगा नदीत आलेल्या पुरामुळे चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेक घरे आणि हॉटेल्स उद्ध्वस्त झाली. या पुरात गाव वाहून गेल्याने ३४ सेकंदात सगळंच संपलं.

उत्तराखंड : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली येथे ढगफुटीमुळे खीर गंगा नदीत आलेल्या पुरामुळे चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेक घरे आणि हॉटेल्स उद्ध्वस्त झाली. या पुरात गाव वाहून गेल्याने ३४ सेकंदात सगळंच संपलं.
उत्तराखंडचे जिल्हा दंडाधिकारी प्रशांत आर्य यांनी घटनास्थळी रवाना होण्यापूर्वी चार जणांच्या मृत्यूची पुष्टी केली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी धाराली येथे झालेल्या मोठ्या नुकसानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की लष्कर, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि जिल्हा प्रशासनाची टीम मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहे. धामी म्हणाले की ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत आणि परिस्थितीची नियमित माहिती घेत आहेत. त्यांनी सांगितले की बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाईल. गंगोत्री धामच्या सुमारे २० किमी आधी धाराली पडते आणि यात्रेतील हा एक प्रमुख थांबा आहे. स्थानिक प्रत्यक्षदर्शी राजेश पनवार यांनी सांगितले की, खीर गंगेच्या पाणलोट क्षेत्रात ढग फुटले, ज्यामुळे नदीत विनाशकारी पूर आला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की वरून नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आणि कचरा आला आणि काही वेळातच घरे आणि हॉटेल्स त्यात बुडाली.
पंतप्रधान मोदींनी घेतली उत्तरकाशीतील परिस्थितीची माहिती
उत्तरकाशीतील धराली येथील या दुर्घटनेतील बाधित लोकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी बोलून तेथील परिस्थितीची माहिती त्यांनी घेतली. राज्य सरकारच्या देखरेखीखाली मदत आणि बचाव पथके सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लोकांपर्यत मदत पोहोचवण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही, असे पीएम मोदी म्हणाले.
