महापालिका निवडणुकीत ‘चार’ प्रभाग, अपक्ष उमेदवारांची होणार दमछाक ?

छत्रपती संभाजीनगर :  आगामी महापालिका निवडणुकीसाठी शासनाने नवी प्रभागरचना जाहीर केली असून, यानुसार आता चार वॉर्डाचा एकत्रित प्रभाग असणार आहे. यामुळे निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार असून, पक्षीय उमेदवारांना मात्र या रचनेचा फायदा मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर :  आगामी महापालिका निवडणुकीसाठी शासनाने नवी प्रभागरचना जाहीर केली असून, यानुसार आता चार वॉर्डाचा एकत्रित प्रभाग असणार आहे. यामुळे निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार असून, पक्षीय उमेदवारांना मात्र या रचनेचा फायदा मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

२०१५ मध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील निवडणूक वॉर्डनिहाय झाली होती आणि तब्बल १७ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर २०२० मध्ये तीन वॉडाँचा एक प्रभाग अशी रचना करण्यात आली होती. मात्र, आता ही संकल्पना बदलून चार वॉर्डाचा एक प्रभाग करण्यात – आला आहे. याचे आदेश १० जून रोजी महापालिका – प्रशासनाला प्राप्त झाले. नवीन प्रभाग रचनेनुसार प्रत्येक उमेदवाराला अधिक लोकसंख्येपर्यंत पोहोचावे लागणार आहे. त्यामुळे प्रचाराचा खर्चही वाढणार आहे. पक्षीय उमेदवारांसाठी पक्षाचे चिन्ह, नेते, कार्यकर्ते आणि आर्थिक रसद ही ताकद असणार आहे. मात्र, अपक्ष उमेदवारांना ही सोय नसल्याने त्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागेल. या नव्या रचनेवर माजी अपक्ष नगरसेवक गोकुळ मलके म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत नागरिक काम करणारा नगरसेवक शोधतात. मात्र, आता अधिक वाँडाँचा प्रभाग झाल्याने अधिक लोकांपर्यंत पोहोचावे लागेल, त्यामुळे खर्चही वाढेल. माजी अपक्ष नगरसेवक रुपचंद वाघमारे म्हणाले, स्थानिक निवडणुकीत उमेदवाराच्या कामाला महत्त्व असते. मी दोन वेळा अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. मात्र, चार वॉडाँचा प्रभाग झाल्याने आता मतदारांपर्यंत पोहोचणे अधिक कठीण होणार आहे.

पक्षीय उमेदवारांसाठी मात्र ही संधी फायदेशीर ठरणार आहे. कारण त्यांच्या मागे पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि प्रचाराचे यंत्रणा सज्ज असते. त्यामुळे प्रभागातील चार वॉर्डामध्ये सहज संपर्क साधता येणार आहे. नवीन प्रभाग रचनेमुळे निवडणूक प्रचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार असून, अपक्ष उमेदवारांसाठी ही निवडणूक अधिक आव्हानात्मक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »