बुलढाणा : शहर पोलिस स्टेशन हद्दीतून चोरी झालेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वीरित्या उलगडा करीत तब्बल २२ मोबाईल जप्त करण्यात आले असून १४ जून रोजी शहर पोलीस स्टेशन येथे सर्व मोबाईल मुळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे, जळगाव, अकोला, जालना यासारख्या परजिल्ह्यात या मोबाईलचा शोध लागला आहे. अनोळखी तरुणांकडून काही लोकांनी हे मोबाईल विकत घेतले असल्याची माहिती आहे. मोबाईल चोरीच्या विविध गुन्ह्याच्या संदर्भाने शहर पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले. या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे मोबाईलचा शोध लावला. तब्बल ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाणेदार रवि राठोड यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे, हेड कॉन्स्टेबल संदीप कायंदे, कॉन्स्टेबल युवराज शिंदे, विनोद बोरे, मनोज सोनूने, कौतिक बोर्डे, विशाल बनकर या पथकाने केली.