dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

35 crore grant scam in Jalna: जालन्यात ३५ कोटींचा अनुदान घोटाळा प्रकरणी १० तलाठ्यांना केले निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

35 crore grant scam in Jalna: नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्या दहा तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा तडकाफडकी निलंबित केले आहे. या तलाठ्यांनी तब्बल 1 कोटींहून अधिक अनुदान हडपल्याचे चौकशीत उघड झाले होते. दरम्यान, अनुदान लाटणाऱ्यांत दोषी आढळलेल्या इतर तलाठी, कृषि सहायक, ग्रामसेवक यांच्यावर देखील निलंबनाची टांगती तलवार आहे.

35 crore grant scam in Jalna

विनोद काळे/ जालना : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्या दहा तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा तडकाफडकी निलंबित केले आहे. या तलाठ्यांनी तब्बल 1 कोटींहून अधिक अनुदान हडपल्याचे चौकशीत उघड झाले होते. दरम्यान, अनुदान लाटणाऱ्यांत दोषी आढळलेल्या इतर तलाठी, कृषि सहायक, ग्रामसेवक यांच्यावर देखील निलंबनाची टांगती तलवार आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यात बनावट शेतकरी दाखवून २६ अधिकाऱ्यांनी तब्बल ३४ कोटी ९७ लाख रुपयांचा घोटाळा केल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समीतीने उघडकीस आणले होते. याबाबत स्वतः जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती.
अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गावातील २६ ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी तब्बल ३४ कोटी ९७ लाख रुपये हडपले असल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष लागले होते. दरम्यान, 10 ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठ्यांवर शुक्रवारी सायंकाळी निलंबनाची कारवाई करण्यात आली असून इतरांचे खुलासे घेऊन अभिलखे तपासणार आहेत. त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.

यांना केले निलंबित

गणेश मिसाळ, कैलास घारे, विठ्ठल गाडेकर, बाळू सानप, पवन सुलाने, शिवाजी ढालके, कल्याण बमनावत, सुनील सोरमारे, प्रवीण शिनगारे, बी. आर. भुसारे.

कोट्यवधी घातले घशात

ग्राम महसूल अधिकारी : गणेश मिसाळ : १ कोटी ८३ लाख ५६ हजार ३९९ रुपये, कैलास घारे : १ कोटी ७३ लाख २६ हजार १७१, विठ्ठल गाडेकर : १ कोटी ५७ लाख ९८ हजार ९०३, बाळू सानप : १ कोटी ३३ लाख ५७ हजार ७९७, पवन सुलाने : १ कोटी १८ लाख ५४ हजार ८७४, शिवाजी ढालके : १ कोटी ३ लाख २५ हजार ५३८, कल्याण बमणावत : ९७ लाख ७४ हजार २२६, सुनील सोरमारे : ७५ लाख ५६ हजार ४३२, अल्ताफ शेख : ४५ लाख ५३ हजार ६२४, मोहित गोषिक : ४२ लाख ७४ हजार ८१३, चंद्रकांत खिल्लारे : ४१ लाख ६८ हजार ६४५, रामेश्वर जाधव : ३३ लाख २ हजार २३, डी. जी कुरेवाड : २६ लाख २६ हजार ५२२, किरण जाधव : २६ लाख २५ हजार ३०४, रमेश कांबळे : २५ लाख ४० हजार ३१, प्रवीण शिनगारे : १ कोटी ३० लाख २७ हजार २२६, बी. आर भुसारे : ८७ लाख ८ हजार ४८२, राजू शेख : ३६ लाख २ हजार २३७, एस. एस कुलकर्णी : ३३ लाख २ हजार ७३८, जे. यू खरजूले : ३२ लाख ८७ हजार १५१.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top