नवी दिल्ली : लोकसभेमध्ये सोमवारपासून ऑपरेशन सिंदूरवरून सुरू असलेल्या चर्चेमध्ये भारताने अचानक मान्य केलेल्या युद्धविरामाचा निर्णय केंद्रस्थानी राहिला होता. तसेच भारताने युद्धविरामाचा निर्णय हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून घेतला का? असा सवाल विरोधी पक्षांकडून विचारण्यात येत होता. या सर्व प्रश्नांची उत्तरं मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला उत्तर देताना दिले. जगातील कुठल्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर रोखण्यास सांगितलं नव्हते, असे स्पष्ट उत्तर नरेंद्र मोदी यांनी दिले.

ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, ९ मे रोजी रात्री अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वान्स यांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र माझी तेव्हा लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू होती. त्यामुळे मला त्यांचा फोन उचलता आला नाही. त्यानंतर मी त्यांना फोन केला. तेव्हा त्यांनी मला सांगितले की, पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. तेव्हा मी त्यांना सांगितले की, पाकिस्तानने अशी आगळीक केली तर ती त्यांना खूप महागात पडेल. तर पाकिस्तानने हल्ला केला तर आम्ही त्यांच्यावर त्यापेक्षा मोठा हल्ला करू. गोळीचे उत्तर हे गोळ्याने दिले जाईल, असे मी त्यांना सांगितले होते.
‘देशात दंगली घडवण्याचे षडयंत्र होते’
पंतप्रधान मोदी म्हणाले, ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यांना आरसा दाखवण्यासाठी मी उभा आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये ज्या प्रकारे क्रूर घटना घडली, ज्या प्रकारे दहशतवाद्यांनी निरपराध लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या, ही क्रूरतेची हद्द होती. भारताला हिंसेच्या आगीत ढकलण्याचा हा पूर्वनियोजित प्रयत्न होता. भारतात दंगली घडवण्याचे हे षडयंत्र होते.