सादिक शेख / आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षकांच्या ६ जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊन मागणी करूनही शिक्षकांची पदे भरली जात नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यी, पालकांनी आन्वा भोकरदन, जळगाव सपकाळ रस्त्यावर गुरूवार, 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता रस्ता रोको आंदोलन केले.

गेल्या चार वर्षांपासून येथील प्रशालेतील शिक्षकांचे सहा पदे रिक्त आहेत. याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थ्यी पालकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहेत.
या प्रशालेतील दोन शिक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या झाल्यामुळे सहा शिक्षकांच्या जागा रिकाम्या असल्याने शिक्षण विभागाने शिक्षक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती व पालकांवर्गातून करण्यात आली आहे.
या ठिकाणी पाचवी ते दहावी पर्यंतचे वर्ग आहेत. सध्या एकूण ६०० विद्यार्थ्यी असून नवीन दाखले घेऊन विद्यार्थ्यी पालक येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यी संख्या वाढत असून या शाळेवर एकूण १६ शिक्षकांची पद मंजूर आहेत. परंतु प्रत्यक्षात मुख्याध्यापकासह असे आठ ते दहा शिक्षक शाळा चालवत असून या प्रशालेत दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहेत.
यासाठी ग्रामस्थांसह विद्यार्थी वर्गातून जिल्हा परिषद प्रशासनाला वेळोवेळी मागणी केली जात आहे. तरीही कायम स्वरूपी शिक्षक उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थ व पालकांमध्ये प्रशासनाविषयी संताप व्यक्त होत आहेत.
आन्वा येथील जि.प प्रशालेसाठी शिक्षण विभागाने ३ जुलै रोजी चार शिक्षकांची नियुक्तीचे आदेश असताना आजपर्यंत हे शिक्षक शाळेवर हजर का झाले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच आंदोलन करताच शिक्षक नियुक्तपत्र का देण्यात आले, असा सवाल पालकांवर्गातून होत आहे.
लेखी आश्वासन
भोकरदन पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन चार ते पाच दिवसांत येथे शिक्षकांची पद भरण्यात येणार असून तात्पुरती चार शिक्षक देण्यात येत आहे, असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन थांबविण्यात आले.