राहेरी बु : श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे विदर्भाच्या सीमेवर जंगी स्वागत करण्यात आले असून सिंदखेडराजा येथील मुक्कामानंतर गुरूवार रोजी दुपारी 1 वाजता राहेरी बु येथे गण गणात बोते या गजरात श्री चे उत्साहात स्वागत करण्यात आले. हा परिसर गजाननाच्या नामघोषात दुमदुमून गेला. तब्बल 700 वारकरी भजनी मंडळाचे निनाद , टाळ मृदुंगाची साथ आणि भव्य पथकांच्या फडफडात फुलांनी सजवलेली पालखीत विराजमान श्रीच्या मुखवटांचे दर्शन होतात वातावरण भक्तीरसाने भारावून गेले.

राहेरी येथे श्रीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी या परिसरातील जांभोरा , वरदडी ,सोनंशी , धानोरा , निमखेड , बुटा , चांगेफळ , रूम्हना , देवखेड ,ताडशिवनी, इत्यादी गावातील श्री गजानन महाराज भक्त श्री घ्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी राहेरी येथे आले असता या ठिकाणी जणुकाही जत्रेचे स्वरूप दिसून आले होते, या ठिकाणी सकाळपासून अनेक खेळण्यांची दुकाने, फिरत्या हॉटेल आले होते.
पालखी मधील वारकऱ्यांना चहापाणी व नाश्ताची व्यवस्था करण्यात आली होती तसेच गावातील जगदंब प्रतिष्ठान प्रसाद वाटप करण्यात आला होता यावेळी गावातील व परिसरातील बहुसंख्य महिला व नागरिक उपस्थित होते. यावेळेस या पालखी सोहळ्यामध्ये अनुचित प्रकार घडू नये याची किनगाव राजा पोलीस स्टेशनची ठाणेदार विनोद नरवडे व पोलीस कर्मचारी यांनी बारकाईने लक्ष देवून जबाबदारी पार पाडली