धारधार शस्त्रांसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात: खुलताबाद  गुन्हे शाखेची धडक कारवाई

खुलताबाद  : खुलताबाद शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या पाच इसमांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, चार धारधार तलवारी व एक कोयता असा एकूण १ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

खुलताबाद  : खुलताबाद शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या पाच इसमांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, चार धारधार तलवारी व एक कोयता असा एकूण १ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अवैध शस्त्र साठा करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेत नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुरुवारी रात्री ९ वाजल्यापासून शुक्रवारी पहाटे ३.३० वाजेपर्यंत खुलताबाद शहरातील विविध भागांमध्ये ही कारवाई केली.

गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील बडके अली मोहल्ला, सईदानिमा मोहल्ला, साळीवाडा या भागांमध्ये संशयितांवर पाळत ठेवण्यात आली. कारवाईदरम्यान मोहमंद अल्तमश फईम (२७), मुजाहिद कुरेशी (२४), फलक नासेर शहा (२२), फैजान अब्दुल शहा (२६) यांच्याकडून धारधार शस्त्र जप्त करण्यात आले.

तसेच गुलाबशहा कॉलनीत राहणाऱ्या अजमत अजीज खान (२७) याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराजवळ सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीत त्याने मंडप डेकोरेटरच्या सामानात कट्टा व दोन जिवंत काडतुसे लपवून ठेवल्याची कबुली दिली.

सदर पाचही आरोपींविरोधात खुलताबाद पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर शुक्रवारी दुपारी सर्व आरोपींना खुलताबाद येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चार आरोपींना जामिनावर मुक्त केले असून, गावठी कट्टा बाळगणाऱ्या अजमत खान यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हे शखेचे विजयसिंग राजपूत, उपनिरीक्षक दीपक पारधे तसेच पोलीस अंमलदार श्रीमंत भालेराव, कासिम पटेल, प्रमोद पाटील, सचिन राठोड, शिवाजी मगर यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »