जळगाव जामोद : अतिवृष्टीमुळे शेतीच झालेल्या नुकसानीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने चक्क शासनाविरोधात रोष व्यक्त करत जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांचे निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना 13 जून रोजी मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

13 जून च्या मध्यरात्री आमदार संजय कुटे हे त्यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी हजर असताना संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुड याने आ. संजय कुटे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात प्रवेश मिळवला व हातात पेट्रोलची कॅन घेऊन मला अतिवृषटीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला अद्याप न मिळाल्याने मी आमदारांचा बंगला जाळून टाकतो अस म्हणत पेट्रोलची कॅन घेऊन बंगल्याच्या प्रवेश द्वारकडे जात असताना कुटे यांच्या स्विय सहायक यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिसांनी शेतकरी विशाल मुरुड यांच्याविरुद्ध कलम 333, 351(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत.